Friday, 14 April 2023

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी भाषण


                              माझ्या भीमाचे चारित्र्य महान
                               भीमराय आहेत आमची शान 
                             त्यांनीच दिली भारताला संविधान  
                             जगात उंचावली भारताची मान 
         अध्यक्ष महाशय ,पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या बाल मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी आशा बाळगतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो .
      भारतीय संविधानाचे जनक ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला त्यांचे मूळ गाव रायगड येथील आबंडवे हे होते .त्या अत्यंत हुशार व चाणाक्ष होते. त्यांनी खूप शिक्षण घेतले. वाचाल तरच वाचाल असे सांगून त्यांनी वाचनाचे महत्व सांगितले .गोरगरीबांसाठी त्यांनी महान कार्य केले. 
          भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.
               . ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.
          एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो , बाबासाहेबांना माझा कोटी कोटी प्रणाम ,जय भीम ,जय हिंद

1 comment:

धन्यवाद मित्रांनो. कमेंट नक्की करा.