अंगाला शहारे, पण हवे हवेसे
मन शांत, विचारात मग्न
काय हवे ते कळतच नाही....
पावसाची उसंत, वाराही बंद
किरकिऱ्यांचे आवाज, पण नको नकोसे.
मनात किररर्र , मनाची घालमेल
काय हवे ते कळतच नाही....
थोडी शांतता, भरपूर विचार
मनाला टोचणारे, पण हवे हवेसे
मन कणखर, विचारानेही सक्त
काय हवे ते कळतच नाही....
सरळ मार्गी, मनही सरळ
स्वभाव थेट पण नको नकोसे
व्यक्तित्व स्वस्त, आचरण मस्त
काय हवे ते कळतच नाही....
मनात आदर, कामात दंग
मार्ग बदल, पण ध्येय्य हवे हवेसे
हळवं जरी मन, शांत असावे
त्यास काय हवे ते कळतच नाही...
हनुमान गिराम
9421425482
No comments:
Post a Comment
धन्यवाद मित्रांनो. कमेंट नक्की करा.