मी नसलो तरी...
असते ती मजेत आता
मी नसलो तरी
ती हसते, गाते, झोपते मजेत
मी नसलो तरी
तिला फरकच नसतो आता
मी नसलो तरी
बघणे ही दुर्लभ केले तिने
मी नसलो तरी
हळूच गालात हसत असेल का?
मी नसलो तरी
एक निखळ हास्य तिचे
मला आनंदाची फुंकर देई
लाजून बोलणे, मुरडून चालणे असेल का
मी नसलो तरी
माझं पूर्ण समर्पण ती
ती नसली तरी
माझं जीवन अन प्रेम ती
मी नसलो तरी
हृदयात तिच्या माझीच प्रतिमा
प्रत्यक्ष मी नसलो तरी
तन नसेल माझे पण मन फक्त माझेच
मी नसलो तरी..
--- बाळू.....
No comments:
Post a Comment
धन्यवाद मित्रांनो. कमेंट नक्की करा.