Tuesday, 18 March 2025

तू खरं छान दिसतेस( कविता)

तू छान दिसते असे म्हटले मी
दिसतेच ग त्यात बिघडले कुठे

मनातील भाव थोडे रेटले मी
भाव फक्त होते ग बिघडले कुठे

अंतरगीचे भाव मुखात साठले मी
अंतरंग माझे निर्मळ ग बिघडले कुठे

ह्रदयाचे तार थोडे ओढले मी
ह्रदय माझे छान ग बिघडले कुठे

मनाने मनाला जरा जोडले मी
मनानच म्हटलं ग बिघडले कुठे

कवी - गिराम सर



No comments:

Post a Comment

धन्यवाद मित्रांनो. कमेंट नक्की करा.