Friday, 29 September 2023

नागफणी ( निवडुंग ) सविस्तर माहिती


     (#नागफणी, फड्या निवडुंग):- ज्येष्ठा नक्षत्राचा पाने व लाकूड नसलेला आराध्यवृक्ष*
                 सांबर या ज्येष्ठाच्या आराध्यवृक्षाची मी सखोल चौकशी केली, मात्र वैद्यकीय तज्ञांना व जाणकारांना शद्ब ज्ञात नसल्याने माझी पंचाईत झाली. फड्या निवडुंग अर्थात नागफणीची फळे कळी खावी याबाबत विचारणा केल्यानंतर मराठी भाषेचे ज्योतिषशास्त्रीय वैभव अनन्यसाधारण असून सांबर म्हणजे फण्या निवडुंग होय, हिंदी व उर्दूत नागफणी म्हणतात, हे जाणकारांनी सांगितले. सांबर या वनस्पतीला नागफणी, चप्पल, बीदर , वज्रकंटक आदि नावाने ओळखले जात असून, पश्चिम आशियात खजूरालाही सांबर म्हणतात. 
          या सांबर वृक्षाचे महत्व:-
१)#हृदयरोग:- सांबराच्या (नागफणी) पंचांगाची राख १०-२० ग्रॅम मधाबरोबर चाटण केल्यास जुलाब होऊन हृद्याची प्रक्रिया सुधारते. लघवी सुटते. तसेच सांबर पंचांगाच्या रसाने हृदयाची धडधड कमी होते. सांबर हे संकोचविकासप्रतिबंधक असल्याने हृदयातील धमन्या व नीला या रक्तवाहिन्या ठप्प होत नाहीत.

२) #पौरुष्य ग्रंथी वृद्धी(प्रोस्टेट ग्लंड):- सध्या आधुनिक आहार-विहारामुळे ९०% वृद्ध पुरुषांना पौरुष्यग्रंथी वृद्धीचा सामना करावा लागत आहे. यामुळे कर्करोगाचे प्रमाण भयानक वाढले आहे. अनियंत्रित लघवी, सतत लघवी, पौरुष्यग्रंथीवृद्धी यावर सांबर (नागफणी) फळांची चुर्ण मधाबरोबर ४० दिवस चाटण करणे लाभदायी व प्रभावी ठरते. पौरुष्यग्रंथीवृद्धीवर ४० दिवस प्रयोग करुन नियंत्रण व पुर्ण उपचार न झाल्यास आपण पंढरीनिवासी राधेश बादले पाटील यांचे मनगट पकडू शकता! म्हणून नागफणी फळ चुर्ण सेवन, नागफणीची भाजी, नागफणीच्या पंचांगाचा रस (१० मिली फक्त) दररोज सेवन करण्यास हरकत नाही.

३) #जखम बरी करण्यासाठी:- सांबराला (नागफणीला) पान लाकूड नसते, तरीही फणीला पान वा फडणीस म्हणतात. याचा पर्णरस काढून जखम धुतल्यास पु, पस होत नाही, तसेच जखम चिघळत नाही. लवकर भरुन येते. म्हणून पर्णरसाने जखम धुवून गराचे पोटीस बांधावे.

४) #त्वचारोग:- लहान मुलांना पुरळ येऊन त्यात पु, पस होतो. त्यास नागफणी बारिक करुन लावणे वा पोटीस बांधणे लाभदायी!

५) #कावीळ:- सांबराच्या(नागफणी) फळ, फुल, पानांची म्हणजे फडांची भाजी खावी वा पंचांगाचा रस १०-२० मिली दररोज घेणे. यामुळे पित्तस्त्राव जास्त होऊन कावीळ बरी होते. याबाबत आपल्या कौटुंबिक वैद्याकडून अधिक माहिती घ्यावी. कारण आम्ही गुडघे फोडून केलेली साहित्यसंपदा काही साहित्यचोर चोरून, बिगरबापाची साहित्यक्षेत्रात आणतात. असो.

६) नारु, सांधेसुज, जीर्ण आमवात:- सांध्यावर फणी वा फडणीस उभे चिरुन गरम करुन, आत हळद व सैंधव भरुन पोटीस बांधल्यास सुज, वेदना कमी होतात. एवढे प्रभावी वेदनाशामक आहे.

७)गलगंड(Goitre):- पंचांगाचा १० मिली रस ९ ते ४० दिवस खाल्यास लाभ होतो.

८) कान व नाक टोचण्यासाठी:- नागफणीचा काटा वापरल्यास पु, पस होत नाही, तसेच कान, नाक टोचलेले कळत नाही. यामुळे शरिरातील शक्ती नियंत्रित राहते.

९) #भुख वाढण्यासाठी, ताप उतरविण्यासाठी, शरिरातील विष नष्ट करण्यासाठी:- नागफणीचा स्वाद कडवट, गोड मात्र गरम असतो. फळांत रस कमी व बिया जास्त असल्याने चावून चावून खाणे महालाभदायी ठरते.

१०) #नेत्रविकार:- अलिकडे भ्रमणध्वनीचा व प्रकाशाचा अतिवापर होत असल्याने रेटीनासह काचबिंदूचा त्रास होतो. यावर डोळ्यांचा बाहेर फडणीसाचा रस लावून, गाभ्याचे पोटीस बांधणे हितकारक ठरते. पोटीस दररोज २० मिनिटे ४० दिवस आवश्यक ठरते.

११)पोट साफ करण्यासाठी :- फळांचे चुर्ण -२ग्रॅम मधासोबत दररोज चाटण करणे.

१२) रक्ताल्पता:- रक्तवृद्धीस्तव, लाल व सफेद पेशींची नियंत्रित वाढ होण्यासाठी, रक्तशुद्धीस्तव सांबराची(नागफणीची) पक्व फळे खावीत. डायलिसीसची उभ्या आयुष्यात गरज पडणार नाही.

१३) #श्वेतप्रदर:- ८०% महिलांना श्वेतप्रदराचा, योनीदर्पाचा महाभयंकर सामना करावा लागतो. २-३ ग्रॅम पक्व फळांची चुर्ण मधाबरोबर ४ दिवस ३ वेळा सेवन करणे उपयुक्त ठरते.
                  पक्व फळे भाजून, कुस काढून, सोलून, खाल्ली तर रामबाण!

१४) नागफणीच्या फुलांवर किरमिजी माशी असते. या माशीपासून किरमिजी व गुलाबी रंग काढतात.

१५) नागफणी फळांचा रस दाहशामक, वेदनाशामक, रेचक आहे. तसेच कफघ्न, संकोचविकासप्रतिबंधक आहे. मुत्रजनक आहे.

१६) सांबर/नागफणीचे शेत वा घराला कुंपन केल्यास वास्तुदोषाचा सामना करावा लागत नाही. शहरात कुंडीत लावून आरोग्य व वास्तू बाबत लाभ घेऊ शकता!

१७)#डांग्या खोकला, घुसमट, कफ:-  नागफणीचे सरबत वा १० मिली अंगरसाचे सेवन उपयुक्त! वृषभ,मिथुन, तुळ, कुंभ या राशींना खोकल्यासह संसर्गाचा सामना सर्वप्रथम करावा लागतो. कोरोनासारख्या सर्व संसर्गाला सांबर/नागफणी मारक आहे. म्हणून पक्व फळे आठवड्यातून एकदातरी खावीत.

१८) सांबर-नागफणीचे सरबत बाजारात उपलब्ध नाही. म्हणून बेरोजगार तरुणांनी नागफणीचे सरबत, पक्व फळांचा रस(ज्युस), पंचांगाचा अंगरस, पंचांगाचे चुर्ण, फळांचे चुर्ण, भाजी करण्यासाठी काटे काढून फडणीस, आदि उत्पादने बाजारात आणून स्वार्थासह परमार्थ साध्य केल्यास सामान्यांना हृदयरोग, प्रोस्टेट ग्लंड, कर्करोग, संसर्गजन्य रोग आदि रोगांचा सामना करावा लागणार नाही व बेरोजगारी निर्मुलनास हातभार लागेल, याची राधेश बादले पाटलांना खात्री आहे.

१९)वृश्चिक राशीतील ज्येष्ठा नक्षत्राचा सांबर-नागफणी हा लाकूड व पाने नसलेला मात्र फडणीस असा आराध्यवृक्ष आहे. य, न या आद्याक्षर असलेल्या, तसेच ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी दरवाढदिनी २१ नागफणी वृक्ष लावावेत. शेत -घराला कुंपन करावे. सुरक्षेसह आरोग्य व धनप्राप्तीसाठी हे महत्वाचे!

२०) नागफणी/सांबराचे फडणीस, फळे काढताना लोखंडी हत्यार वापरु नये, असा संकेत व दंडक आहे. असे का? मात्र मला अधिक माहिती नाही. तसेच पक्व फळांची कुस तरवड वा निरगुडीने झाडून वा मंदाग्नी/आरावर भाजून काढतां येते. फळांची कुस(लहान काटे) काढल्याशिवाय फळे खाऊ नयेत, अन्यथा हात व जीभेला कुस टोचून सतावते, निघत नाही. अशावेळी साजूक तूप लावावे.

२१) भाजी:- फडणीसांची काटे काढून, आरावर भाजून, कापून छान भाजी करता येते.

२२) नागफणी हा सोन्याचा दागिणा महिलांना खुप आवडतो. बाजुबंदाला बहुदा नागफणी वापरतात.

No comments:

Post a Comment

धन्यवाद मित्रांनो. कमेंट नक्की करा.