Thursday, 15 June 2023

केंद्रप्रमुख भरती परीक्षा प्रश्नसंच (घटक - शिक्षक अभियोग्यता )

१. स्वातंत्र्यपूर्व काळात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह खालीलपैकी कोणी धरला होता ?

 ( अ ) नामदार गो . कृ . गोखले 
( ब ) लोकमान्य टिळक
 ( क ) न्यायमुर्ती म . गो . रानडे 
( ड ) बेहरामजी मलबारी 


२. " शिक्षण व तत्त्वज्ञान या एकाच 
नाण्याच्या दोन बाजू आहेत , " असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे ? 

( अ ) जॉन ड्युई 
( ब ) थॉर्नडाईक 
( क ) ॲरिस्टॉटल (
 ड ) जॉन अॅडम्स 

३. “ शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे , ” असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे ? 

( अ ) रूसो
 ( ब ) प्लेटो 
( क ) जॉन ड्युई 
( ड ) फ्रोबेल 

४. शिक्षणाद्वारे वैश्विक संस्कृती निर्माण व्हावी , अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली आहे . 

( अ ) रवींद्रनाथ टागोर
 ( क ) रूसो 
( ब ) महात्मा गांधी
 ( ड ) प्लेटो

 ५. रवींद्रनाथांची शिक्षणविषयक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणून खालीलपैकी कोणत्या बाबीचा उल्लेख करता येईल ? 

( अ ) निसर्गसान्निध्यातील शिक्षण ( ब ) पुस्तकी ज्ञानाचा निषेध
 ( क ) कृतियुक्त अध्यापन 
( ड ) मानवतावादाची विश्वव्यापी कल्पना 

६. महात्मा गांधींना अभिप्रेत असलेला शिक्षणाचा अर्थ 

( अ ) व्यक्तीच्या पूर्णत्वाचा विकास . ( ब ) व्यक्तीच्या शारीरिक , मानसिक व आत्मिक शक्तींचे उन्नयन . 
( क ) माणूस घडविणे . 
( ड ) आत्मसाक्षात्कार .

७. महात्मा गांधींच्या मते शिक्षणाचे माध्यम

 ( अ ) मराठी
 ( ब ) राष्ट्रभाषा
 ( ड ) मातृभाषा 
( क ) विश्वभाषा 

८. हा प्रश्नोत्तर पद्धतीचा जनक मानला जातो . 
( ब ) सॉक्रेटिस 
( अ ) प्लेटो 
( क ) जॉन ड्युई 
(ड) रुसो

९ . विज्ञाननिष्ठा हे .....प्रकारचे मूल्य आहे.
( अ ) बौद्धिक 
(ब) भावनानिष्ठ
( क ) आध्यात्मिक 
(ड) सौंदर्य विषयक


 १०. भारतीय घटनेतील कलमात नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वान्वये राज्याने मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची तरतूद करावी अशी अपेक्षा बाळगली आहे . 

( अ ) चाळिसाव्या
 ( ब ) पन्नासाव्या 
( क ) पंचेचाळिसाव्या
 ( ड ) पंचावन्नाव्या 

११. भारतीय घटनेतील . ....ही कलमे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांशी संबंधित आहेत .
 ( अ ) २५ व २६ 
( ब ) ३१ व ३२ 
( क ) २ ९ व ३० 
( ड ) ४१ व ४२

 १२. भारतीय घटनेतील .... व्या कलमान्वये अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व चालविण्याचा हक्क बहाल करण्यात आला आहे .
 ( अ ) २७ 
( ब ) ३०
 ( क ) २८
 ( ड ) ३२ 

१३. “ शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे , ” हा संदेश .... या थोर समाज - सेवकाने आपल्या ' तृतीय रत्न ' या नाटकातून दिला आहे .

 ( अ ) लोकहितवादी
 ( ब ) महर्षी कर्वे 
( क ) डॉ . बाबासाहेब आंबेडकर 
ड ) महात्मा जोतीबा फुले

उत्तरसूची -
१. ( अ ) २. ( ड ) ५. ( ड ) ६. ( ब ) ९ . ( अ ) १० ( क ) १३. ( ड ) ३. ( क ) ७. ( ड ) ११ ( क ) ४. ( अ ) ८. ( ब ) १२. ( ब )

No comments:

Post a Comment

धन्यवाद मित्रांनो. कमेंट नक्की करा.