१. ' जागृती ' या शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय ओळखा
( अ ) झोप येण्याची अवस्था .
( ब ) सावधपणा
( क ) सहानुभाव
( ड ) स्वप्नावस्था
2. ' पडताळा ' म्हणजे काय ?
( अ ) जमिनीवर पडणे
( ब ) खाली पडलेले कुलूप
( क ) प्रचिती
( ड ) पीकपाणी
३. ' समचरण ' या शब्दासाठी पर्यायी शब्द लिहा .
( अ ) सारखी पावले
( ब ) पुढे - मागे असलेली पावले
( क ) जुळलेली पावले
( ड ) विटेवरची पावले
४. ' अभियोग ' या शब्दाचा पर्यायी शब्द
( अ ) समारोप
( ब ) खटला
( क ) योगायोग
( ड) अतिलोभ
५.' देखणी ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
( अ ) लावण्यवती
( ब ) सौभाग्यवती
( क ) कलावती
( ड ) रेखीववृत्ती
६. ' स्लाघ्य ' म्हणजे
( अ ) सुंदर
( ब ) निंद्य
( क ) प्रशंसनीय
( ड ) वाईट
७. बाजीराव गादीवर बसला ' या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा समानअर्थी शब्द ओळखा .
( १ ) सिंहासन
( २ ) आसन
( ३ ) तख्त
( अ ) फक्त १
( ब ) फक्त १ व ३
( क ) फक्त १ व २
( ड ) १,२,३ तिन्ही
८. ' अब्द ' या शब्दाचा पर्यायी
( अ ) लक्ष
( ब ) मेघ
( क ) अब्ज
( ड ) अक्ष
९.' अचपळ ' या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?
( अ ) प्रगतिशील
( ब ) पळपुटा
( क ) अवखळ
( ड ) ओढाळ
१०. समान अर्थाचा शब्द ओळखा- ' विमोचन '
( अ ) आंकुचन
( ब ) प्रसारण
( क ) संश्लेषण
( ड ) मुक्ती
११. ' नवोढा ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
( अ ) कुमारिका
( ब ) गृहिणी
( क ) लेकुरवाळी
( ड ) नववधू
१२. ' रास ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
( अ ) सिंह
( ब ) राग
( क ) कडू
( ड ) ढीग
१३. ' सव्यापसव्य ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
( अ ) आजूबाजूला
( ब ) नसती उठाठेव
( क ) हमरीतुमरी
( ड ) अघळपगळ
१४. ' मधुकर ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .
( अ ) सखा
( ब ) मधमाशी
( क ) मधुर
( ड ) भ्रमर
१५. ' पंक्तिप्रपंच ' या शब्दास समानार्थी शब्द कोणता ?
( अ ) पक्षपातीपणा
( ब ) जेवणावळ
( क ) अनेक पंगती
( ड ) मोठा प्रपंच
१६. ' दाम करी काम ' अधोरेखित केलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
( अ ) दमा
( ब ) डाग
( क ) दम
( ड ) पैसा
१७. ' सूतोवाच करणे ' या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा .
( अ ) सोक्षमोक्ष करणे
( ब ) सोंग करणे
( क ) समझोता करणे
( ड ) ओनामा करणे
१८. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा .
( १ ) अचूक - बरोबर
( २ ) प्रवास भ्रमन्ती
( ३ ) इमारत - सदन
( ४ ) आचारी स्वयंपाकी
( अ ) फक्त १ व ३
( ब ) फक्त ३
( क ) फक्त २
( ड ) फक्त २ व ४
उत्तर सूची :-
16 व्या प्रश्नाला अधोरेखित केले नाही
ReplyDelete