Friday, 30 January 2026

वाढदिवसाची कविता, चारोळी

*🙏ताईंवर सुचलेल्या चार ओळी🙏*

🪻नको, नाही, का? कोण? प्रश्न कधी आलेच नाही...
हसत मुखाने, सर्वांन सोबत विरोध करणे जमलेच नाही....

 🪻सर्व माझे,सर्व आपले मनात दुरावा आलाच नाही..
 जमेल तसे, जमेल ते, कामात कंटाळा केलाच नाही...

 🪻हसतमुख, आनंदी चेहरा दुःख दाखवता आलेच नाही...
 निखाऱ्यावरही फुले अंथरली, मागे थांबता आलेच नाही...

🪻 वादळी आली, संकटे झेलली ते पकडून बसता आलेच नाही..
 शांत, संयम, जिद्द, चिकाटी धैर्य हरता आलेच नाही...

🪻चेहऱ्यावर हास्य, बोलण्यात गोडवा इज्जत प्रत्येकास दिली तुम्ही....
 ताई आमच्या आई समान, स्वभाव आपला जाणून आम्ही....

 🪻हसत रहा, निरोगी रहा जिंकून घ्या जीवनाचे सार....
 कुटुंबाला दिशा तुमचीच,नको मनावर कोणताच भार..... 


*🙏वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺*

गिराम.... 🙏🙏

No comments:

Post a Comment

धन्यवाद मित्रांनो. कमेंट नक्की करा.