Sunday, 23 June 2024

वाढदिवस चारोळी

ताऱ्यासारखे चमका
 फुलासारखे मेहका 
         नदीसारखे खळखळून हसा           
         नेहमी नको कधीतरीच रुसा
 दुःखाला नको वाव 
अंजली तुमचे नाव....



 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐

वाढदिवस कविता

जागतिक योगदिन आज जसे
आपला जन्मदिन खास असे
योग करा अन राहा स्वस्थ
आज आहेत तंदुरुस्त तसे

हसणे आपले आहे जसे
फुलपाखरू फुलांवर वसे
बोला बोला खूप सारे
झऱ्याचे पाणी खळखळते तसे

मैत्री करावी आपल्यासम
पाऊस चातकाचे नाते जसे
क्षणात भांडू ते क्षणात सांडू
नासलेले दूध जसे

रुसणं नाही हसणं केवळ
गप्पांमध्ये भीती नसे
गैरसमज नसावा कधीही
मुळात स्वभाव आपला जसे


आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✨✨✨✨✨✨✨

कविता मित्र

खूप आठवण येते मित्रा
एकटे एकटे वाटल्यावर
उगाच गालात हसतो असतो
किस्से जुने आठवल्यावर

इकडे बघून तिकडे बघून
टर सर्वांची घायची
आपल्यावर बाजू पलटली तर
हळूच कलटी मारायची

अजूनही वाटते मला 
गुपचूप गप्पा होतील रे
उगाच दुसर्यांना बघून बघून
हास्याचे फुगे उडतील रे

कामात आनंद अन आनंदात काम
आनंद सर्वांना वाटायचा
जीवनातील प्रत्येक दिवस
आनंदानेच गाठायचा

जाल तिथे फुलवाल आपण
गुणवत्तेची बाग हो
यशाची शिखरे पार कराल
हीच प्रार्थना आज हो

*मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✨✨✨✨✨🙏🙏🙏🙏*